Views

*शिवसेनेच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप*


उस्मानाबाद :- (सैफोदिन काझी) 

वाशी शहरासह ग्रामीण भागांमध्ये  शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे यांच्या वतीने मदत नव्हे तर कर्तव्य या उद्देशाने आज 
रविवार दि.07 जून रोजी पाच हजार कुटुंबाना आयुष्य मंत्रालयाने शिफारस केलेल्या अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहेत .
वाशी नगर पंचायत हद्दी मध्ये तसेच केळेवाडी,कवडेवाडी,या सह वाड्या- वस्त्यांमध्ये अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या वाटप करण्यासाठी कार्यकर्त्यांची नऊ टिम बनवन्यात आल्या असून , त्या संबंधीत सर्व सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत. या गोळ्यांचे सेवन केव्हा व कसे करायचे , त्याचे प्रमाण तसेच त्याचे किती डोस घ्यावे लागतील ते कोणत्या पद्धतीने घ्यावे याची सर्व कल्पना देऊन वाटपाची सर्व तयारी करण्यात आल्याचे प्रशांत चेडे मित्रमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

 
Top