Views


बार्शी शहरातील सोलापूर रोड या भागात सद्य स्थितीचा आढावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतला.

बार्शी:-(प्रतिनिधी)

    बार्शी शहरातील सोलापूर रोड या भागात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सद्य स्थितीचा आढावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेऊन नविन आणखीन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. 
      या भागात तात्काळ फवारणी करावी. दररोज आरोग्य, महसूलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी करावी. अन्नधान्याचे किटचे नियोजन करावे. तसेच प्रशासना मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले .
     यावेळी  बार्शी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, भाऊसाहेब आंधळकर, तहसीलदार प्रदिप शेलार, नायब तहसिलदार श्री. मुंडे,  नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.गवळी, अतिष भिसेन, वैद्यकिय अधिकारी, पोलिस प्रशासनाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

 
Top