उस्मानाबाद जिल्ह्यात तीन नवीन रुग्ण पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - (सैफोदीन काझी)
उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवार (दि.१९) रोजी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. एक रुग्ण परंडा तालुक्यातील खानापूर आणि दोन रुग्ण भूम तालुक्यातील जांब येथील आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३३ जणांचा स्वाब आज तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , लातूर येथे पाठविण्यात आला होता. सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी तीन पॉजिटीव्ह असून,२९ निगेटिव्ह आहेत.एक रिपोर्ट inconclusive आहे.
पॉजिटीव्ह रुग्णात एक रुग्ण परंडा तालुक्यातील खानापूर येथील असून कल्याण, मुंबई येथून आला आहे. दोन रुग्ण भूम तालुक्यातील जांब येथील असून पुणे येथून आले आहेत.
एकूण बाधित रुग्ण - १६८
बरे झालेले रुग्ण - १२९
मृत्यू पावलेले रुग्ण - ६
ऍक्टिव्ह रुग्ण - ३३