Views


देवडा फाउंडेशन व जीवराज प्रतिष्ठान यांना अन्नदाता पुरस्कार

कळंब:-(प्रतिनिधी)
 कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा अन्नदाता पुरस्कार यावर्षी कळंब येथील देवडा फाऊंडेशन व जीवराज प्रतिष्ठान यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी जाहीर केला. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. 
    वर्षभर विविध सामाजिक कामात अग्रेसर राहून अन्नदाता करणाऱ्या व्यक्ती संस्थाना हा पुरस्कार देण्यात येतो यावर्षी वर्षभर व कोरोना लोकडाऊन च्या काळात करसन पटेल , अभय देवडा, संजय देवडा यांच्या संस्थेने मोठ्या प्रमाणावर अन्नदान करून , कर्मचारी, सर्व सामान्यांना व गरजूंना घरपोच अन्नदान करून कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली होती. देवडा परिवार यांच्या स्व. विजयकुमार देवडा फाऊंडेशन व करसन पटेल यांच्या जीवराज प्रतिष्ठान यांची जेष्ठ पत्रकार माधवसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या दोन्ही संस्थांची अन्नदाता पुरस्कार साठी निवड करण्यात आली. या पुरस्काराचे वितरण लवकरच होणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी दिली.

 
Top