तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा व तामलवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळूनआल्याने गावास खासदार ओमराजे निंबाळकर सद्य स्थितीचा आढावा घेतला
उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
माळुंब्रा व तामलवाडी गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम-३० या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या. तसेच ग्रामस्थांनी प्रशासन मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे खासदार ओमराजे निंबाळकर असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील ,तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्मिता लोंढे, तामलवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. नितिन मिरकर,शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, विभागप्रमुख प्रदिप मगर, अपुराजे गवळी, ग्रा.पं. सदस्य पांडुरंग लोंढे, मुकुंद गायकवाड, मा.सरपंच वडणे, माळुंब्राचे मा सरपंच गजानन वडणे, चेतन बंडगर, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.