Views


नैतिक अँग्रो प्रोड्युसर कंपनी लि.वाशी च्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीसाठी बांधावर खते बियाणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आले

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

 वाशी येथील नैतिक अँग्रो प्रोड्युसर कंपनी लि.वाशी च्या वतीने शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे वाटपास वाशी मंडळ कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. करोना रोगाच्या पाश्वभुमीवर खते बियाणे खरेदीसाठी दुकानात होणारी गर्दी टाळण्यासाठी, व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बांधावर खते देणाच्या निर्णय नैतिक अँग्रो प्रोड्युसर कंपनीने घेतला होता. त्यासाठी निविष्ठा व्रिक्रीचा परवाना कृषी विभागाकडून घेऊन. शेतकऱ्यांच्या थेट शेतात पेरणीसाठी खते बियाणे देण्यात येत आहेत. त्याचा शुभारंभ आज सभासद शेतकऱ्यांच्या शेतात पार पडला. या कार्यक्रमाला वाशी मंडळ कृषी अधिकारी श्री. भांडवले साहेब, कृषी पर्यवेक्षक शिंदे साहेब,कृषी सहाय्यक लोंढे साहेब,कंपनीचे चेअरमन श्री. नितीन घुले व सभासद शेतकरी बिपिन घुले, धनराज गपाट,सुनील रसाळ,किरण घुले, संग्राम नन्नवरे,अमर शेरकर,भैय्या जगताप, विष्णू देशमुख, संदिप घुले,अशोक चेडे आदी उपस्थित होते.

 
Top