Views


*कळंब तालुक्यातील सुपुत्राची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी

*राज्यात दुसर्‍या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदी निवड 

उस्मानाबाद:- (सैफोदीन काझी)

याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब तालुक्यातील बोर्डा या गावचे मुळ रहिवासी  सुपुत्र डॉ. रवींद्र अप्पदेव शेळके यांची राज्यात दुसर्‍या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.
     डॉ.रविंद्र अप्पदेव शेळके यांचे शिक्षण कळंब येथील सावित्रीबाई फुले शाळेतुन पुर्ण केले तर अकरावी बारावी चे शिक्षण लातुर येथील महाविद्यालयातुन पुर्ण करून मुंबईतील लोकमान्य टिळक मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेत एम.बी.बी.एस पदवी पूर्ण केली मागील काही काळापासून ते दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बाजी मारून राज्यात दुसर्‍या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.ते  यापुढे सातत्याने अभ्यास करत युपीएससी परीक्षेची तयारी सुरू ठेवणार आहेत असे मत डॉ.रविंद्र शेळके यांनी व्यक्त केले.
   डॉ.रविंद्र शेळके यांच्या या घवघवीत यशाने समस्त मित्र परिवार व कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्यांच्या वर कौतुकाचे वर्षाव होत आहे


 
Top