Views


पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी,आंतरराष्ट्रीय करार रद्द  करण्यासह विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले               

कळंब:-(प्रतिनिधी)

                  रिपब्लिकन सेनेच्या वतीने देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने सामान्य माणूस पेट्रोल डिझेल दरवाढीने हैराण झाला आहे लाॅकडाऊन मूळे सर्व आर्थिक व्यवहार कोलमडून गेल्यामुळे देशातील सामान्य माणसाला प्रचंड प्रमाणात ताण आला आहे. भारतामध्ये मिळणाऱ्या पेट्रोल डिझेल वर वेगवेगळ्या राज्याच्या ठिकाणी वेगवेगळे दर आहेत तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स  लावल्याने त्याचा परिणाम हा पेट्रोल व डिझेलच्या किंमती वर होताना दिसत आहे .त्यामुळे सामान्य माणसाला मिळणारे डिझेल व पेट्रोल हे अत्यंत महाग मिळत आहे त्यामुळे भारत सरकारने हे टॅक्स कमी करावेत व  जनतेला  कमी किमतीत पेट्रोल व डिझेल उपलब्ध करुन देण्यात यावे.  तसेच भारत देशावर आक्रमण करून भारतीय सैनिकांना शहीद करणार्‍या  चिनला धडा शिकविण्यासाठी व भारतीय सैनिकांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारत सरकारने चीन सोबत चे सर्व आंतरराष्ट्रीय करार रद्द करण्यात यावेत चिनमधून आयात करण्यात येणाऱ्या मालावर बंदी घालण्यात यावी  फक्त देशात बंदी घालून काहीही होणार नसून भारतात मालच येणार नाही याची दक्षता भारत सरकारने घ्यावी जर देशाने चीन सोबतचे सर्व करार रद्द केले नाहीत तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने संसद भवन परिसरात तिव्र निदर्शने करण्यात येतील असे निवेदन उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत मा नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री भारत सरकार यांना दिले आहे या निवेदनावर  रिपब्लिकन सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षअनिल हजारे,लाखन गायकवाड ,तालुका प्रमुख कळंब ॲड ई बी वाघमारे ,सुरज वाघमारे ,अरविंद ताकपिरे ,मनोज भुंबे ,यांनी स्वाक्षरी केल्या
 
Top