Views


करोणामुळे जिल्ह्यात २४ तासांच्या आत ३  कोरोणा बाधित रूग्णांचा मृत्यू

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोणा चे एकुण ६ बळी

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

     उस्मानाबाद जिल्ह्यात काल शनिवार  कोरोणा बाधित  तरूणाचा मृत्यू झाला होता.या घटनेला २४ तास होत नाही तोपर्यंत आज रविवार (दि.१४) रोजी कोरोणाना चे एकाच दिवशी दोन बळी गेले. 
      उस्मानाबाद शहरातील काका नगर येथील उस्मानपुरा भागातील कोरोणा बाधित ५० वर्षीय पुरूषाचा सकाळी मृत्यू झाला काही तासातच उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील एका ७५ वर्षीय वृद्धाचा  मृत्यू  झाला. 
या वृद्धास काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यास उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आॅडमिट करण्यात आले होते. दहा दिवसानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून त्यास परत उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु  मृत्यू  झाला आहे.  या मृत रुग्णाला दमा, मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी माहिती दिली .
    करोणामुळे जिल्ह्यात २४ तासांच्या आत ३  कोरोणा बाधित रूग्णांचा मृत्यू 
झाल्याने जिल्ह्यातील मृतांची  संख्या ६  झाली आहे.यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे 
 जिल्ह्यात आतापर्यंत कोरोणामुळे ६ जणांचे बळी गेले आहे.
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स* 
कोरोनाग्रस्त:- 146
उपचार घेत असलेले :- 35
कोरोनमुक्त झालेले :-105
मृत्यू :- 06
एकूण जिल्हा 146

 
Top