Views


उस्मानाबाद जिल्हा मध्ये चौथा कोरोणा बळी

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

    कोरोणा मुळे उस्मानाबाद जिल्ह्यात आज शनिवार (दि.१३) रोजी  तरूणाचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दानी देवी मंदिर परिसरातील तरूण अंदाजे  २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू आज झाला आहे.हा तरूण १७ मे रोजी कोरोणा पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा पासून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.तेव्हा पासून त्याची प्रकृती चिंताजनक होती.अखेर आज शनिवार (दि.१३) रोजी त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.त्याच्या संपर्कातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोणामुळे ४ जणांचे बळी गेले आहे.
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स* 
कोरोनाग्रस्त:- 142
उपचार घेत असलेले :- 33
कोरोनमुक्त झालेले :-105
मृत्यू :- 04
एकूण जिल्हा 142

 
Top