Views


लाॅकडाऊन मध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध व्हावा म्हणून  100 ते 1000 रुपये मोजायला लागतात

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)

कोरोना(कोविड-19) विषाणू संसर्ग रोखण्यासाठी   राज्यात सरकार ने लाॅकडाऊन जारी केले आहे.या लाॅकडाऊन मध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्य सरकारने  जिल्हा बंदी करण्यात आली आहे. या काळात अतिमहत्त्वाच्या कामानिमित्त नागरिकांना प्रवास करण्यासाठी शासनाने ई-पास ची व्यवस्था केली आहे.
       त्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर सविस्तर अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन टोकन प्राप्त होते.व तदनंतर योग्य कारण असल्यास प्रशासनाकडून ते स्वीकृत केले जाते.परंतु अनेकांकडे योग्य सबळ कारण देता येत नसल्याने ई-पास नाकारण्यात येते.पास उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिक लाॅकडाऊन मध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध व्हावा म्हणून एजंटाशी संपर्क साधतात व 100 ते 1000 रुपये मोजायला तयार होतात. कळंब येथील एजंटाने काही तासात पास उपलब्ध करुन देण्यासाठी हजारो रुपयांची मागणी होत असल्याची चर्चा होत आहे.


           

 
Top