Views

वाशी तालुक्यातील इंदापूर भागात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

     वाशी तालुक्यातील इंदापूर भागात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड, साठवलेल्या कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच विजेचे खांब पडले आहेत याची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
     यावेळी जि.प.सदस्य उद्धव साळवी, बाबा घोलप, शिवसेना तालुकाप्रमुख अॕड.सत्यवान गपाट, तहसीलदार संदिप राजपुरे, महावितरणचे श्री. हिंगमीरे, तलाठी श्री. थोरबोले, अॕड. कोरे साहेब, अॕड. मोगल साहेब, हिंदुराज गपाट, अमित गपाट, सुंदर पारडे, पोलिस पाटील बालाजी पारडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top