*धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले*
*धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगिरी करून अनेक गुन्हे उघडकीस आल्या बद्दल विशेष गौरव*
धाराशिव/ प्रतिनिधी
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस अनून विविध गुन्ह्यामध्ये फरारी आरोपींना अटक करून मुद्देमाल सह अटक केली या उत्कृष्ट कामगिरी ची दखल घेत विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे टीम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वलीउल्ला काझी, पोलिस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, जावेद काझी, चापोका रत्नदीप डोंगरे यांच्या टीमस आहे विशेष गौरव करण्यात आले यावेळी धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार उपस्थित होते