Views


*दरोड्याच्या तयारीत असणारे पाच संशयितांना पैकी तीन संशयित धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*

*अंधाराचा फायदा घेत दोन संशयित तरुण फरार होण्यात यशस्वी*

*तिन्ही तरूण सांगली जिल्ह्यातील*

*धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई*





धाराशिव/प्रतिनिधी 

दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले रविवार (दि.23) रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना पथकास ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्या जवळील जुना पळसप रोडवर संशयास्पद पाच इसम दिसून आले 
    धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने जवळ जाऊन पाहणी केली असता दोन इसम अंधाराचा फायदा घेत मोटरसायकलसह पळून गेले, तर उर्वरित तीन इसम पळून जात असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशी आणि झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य, कत्ती, कटावणी, कटर, 600 रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 90,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त रून संतोष प्रभाकर कुराडे (वय 36, रा. सुभाष नगर, अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली), अविनाश प्रभाकर कुराडे (वय 34, रा. सुभाष नगर, अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) आणि प्रवीण राजाराम मोरे (वय 30, रा. चांदोल वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) या संशयितांना ताब्यात घेण्यात आले 

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांवर धाराशिव आणि सांगली जिल्ह्यात त्यांच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्यानंतर सपोनि कासार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाणे ढोकी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 97/25, कलम 310(4), 301(5) भारतीय दंड संहितेसह कलम 4, 25 भा.ह.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


ताब्यात घेतलेल्या इसमांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी ढोकी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

 सदर कारवाई ही धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे आणि नितीन भोसले यांनी केली 

 
Top