Views


*पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यासाठी कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूल सहकार्य करणार रवी नरहिरे*



कळंब/प्रतिनिधी 



  आज पत्रकारीता क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असून हे बदल स्वीकारण्यासाठी पत्रकारांची तयारी असली पाहिजे हे तंत्रज्ञान कळंब येथील कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असून यासाठी विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्राची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असून यासाठी स्वतंत्र स्टुडिओची निर्मिती केली आहे . याचबरोबर ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रसार माध्यमातील बदलाविषयी व तंत्रज्ञाना विषयी माहिती मिळावी यासाठी पत्रकारांची कार्यशाळा घेण्यात यावी यासाठी कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूल सहकार्य करील असे विचार कॅनवास इंटरनॅशनल स्कूल कळंबचे संचालक रवी नरहिरे यांनी कळंबा तालुक व्हाईस ऑफ मीडिया च्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी मुंडे शॉपिंग सेंटर कळंब येथे आयोजित पत्रकार व कर्तुत्वान व्यक्ती सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना व्यक्त केले

 मंचावर अमर चोंदे व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य कार्यवाहक,
 गोरक्षनाथ मदने व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर ,गणेश खविटकर व्हाईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष दक्षिण अहिल्यानगर ,महादेव महाराज अडसूळ जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महासंघ धाराशिव , पांडुरंग मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक कळंब, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी अडसूळ, परमेश्वर पालकर, शितल घोंगडे, बाळासाहेब गडाख (अहिल्यानगर )यांची उपस्थिती होती,
याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ, गोरक्षनाथ मदने, गणेश खविटकर, यांनी तसेच ज्येष्ठ पत्रकार गणेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमात सत्कारमुर्तीचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पहार शाल , सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन. सत्कार करण्यात आला गणेश (अण्णा) शिंदे
(जेष्ठ पत्रकार)
 माधवसिंग राजपूत
(जेष्ठ पत्रकार)
 सुभाष घोडके
(जेष्ठ पत्रकार)
 दिलीप झोरी (जेष्ठ पत्रकार)
तुळशीराम चंदनशिवे
(जेष्ठ पत्रकार)
 प्रा. डॉ. साजेद चाऊस प्राचार्य शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण राजेंद्र बिक्कड आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त, डॉ.करिष्मा शेख दंत रोग तज्ञ तसेच या प्रसंगी कार्यक्रमात व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य कार्यवाहक अमर चोंदे, धाराशिव जिल्हा व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती झाली याबद्दल रामराजे जगताप , व्हॉइस ऑफ इंडिया कळंब तालुका उपाध्यक्ष दीपक बारकुल यांचा सत्कार करण्यात आला, तसेच येरमाळा पत्रकार संघाने अभ्यासिका व व्यायामशाळा यासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला यासाठी येरमाळा पत्रकार संघातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामरतन कांबळे, बहारदार सूत्रसंचालन, भारत जोशी यांनी केले तर आभार राजेंद्र बिक्कड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,शिवप्रसाद बियाणी, अमोल रणदिवे, राजाभाऊ बारगुले, राजेंद्र कांबळे, अविनाश सावंत, सतीश आडसूळ, सतीश तवले,हनुमंत पाटोळे, यांनी परिश्रम घेतले


 
Top