*कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिवसाढवळ्या घरफोड्या करणारी अट्टल चोरांची टोळी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात*
*59.61ग्रॅम सोन्याच्या दागिने सह एक दुचाकी असे एकूण 3,18,300 रूपयाचे मुद्दामाल जप्त*
*धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई*
धाराशिव/प्रतिनिधी
कर्नाटक सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोडी करणारे टोळी हे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले धाराशिव शहरातील छत्रपती संभाजी नगर भागातील 29 डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्याने कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील 97 ग्रॅमचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 2,91,000/- मुद्दे माल अज्ञात चोरून नेहल्याचे गुन्हा धाराशिव येथील आनंद नगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता.
जिल्ह्यातील विविध गुन्हे तापास कामी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवार (दि.02) रोजी कळंब पोलिस उपविभागीय क्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना धाराशिव घरफोडी करणारे गुन्ह्यातील संशयित कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रामराजे क्षिरसागर रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव हा त्याच्या एका साथीदार सोबत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली पथकाने तत्काळ कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन शोध घेतला असता संशयितांना एका दुचाकी सह ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्या कडे धाराशिव शहरातील घरफोड्याची चौकशी केली असता त्यांनी तीन चार दिवसांपूर्वी धाराशिव शहरात तीन ठिकाणी वाशी भागात दोन ठिकाणी तसेच तामलवाडी, नळदुर्ग भागात एक एक ठिकाणी तसेच लातूर येथे एका ठिकाणी असे घरफोडी केल्याचे दोघं गुन्ह्याची कबूल दिली या घटनेत एक दुचाकीचा वापर करून दिवसा चोऱ्या केल्या असल्याचे सांगितले त्यावरून पथकाने त्या दोघा कडून 59.61 ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोटरसायकल असा एकूण 3,18,300 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच आरोपी रामराजे उर्फ राम लक्ष्मण क्षीरसागर रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव, धनंजय उर्फ डिके हरीष काळे रा. गणपती मंदिर शेजारी काटेचा कासारवाडी पिंपरी चिंचवड पुणे व त्यांचा साथीदार संतोष विश्वनाथ कसबे रा. शिवाजीनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी वरील कबुली दिली आहे त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता धाराशिव येथील आनंद नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले
सदर कारवाई ही धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, जावेद काझी चालक तानाजी शिंदे यांच्या पथकाने केली