Views


*मोबाईल शॉपी फोडणारे आरोपी धाराशिव पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”*
 
*आरोपी कडून चोरीतील 5,35,206 रूपये किंमतीचे 25 मोबाईल फोन असे मुद्देमाल जप्त* 

*धाराशिव पोलीस स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई*

धाराशिव/ प्रतिनिधी 


भूम शहरातील जय म्युझिकल ॲण्ड मोबाईल शाॅपी 
नावाचे मोबाईल दुकानाचे शटर लॅक तोडून अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करून दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे टेक्नो एच.एम.डी. विवो, सॅमसंग झेड फोल्ड 6, वन प्लस 10 आर, रेडमी कंपनीचे एआर बडस, रेडमी कंपनीचे स्मार्ट वॉच असे एकुण 6,89,866₹ किंमतीचा माल चोरट्यांनी चोरले असल्याचे फिर्याद 19 नोव्हेंबर रोजी मोहन रामचंद्र बागडे यांनी भूम पोलिस ठाण्यात दिली तक्रारी वरून अज्ञात चोरट्यांन विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला 

जिल्ह्यातील विविध गुन्हा तपास दरम्यान धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने कांही मोबाईल फोनचे लोकेशन धाराशिव, भुम, मोहा, ढोकी, माळकरंजा असे वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून शोध घेतला. मोबाईल सिम चा धरक यास त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाईल फोन बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, मागील चार दिवसापुर्वी भिमा काळे रा. सांजा रोड धाराशिव याच्याकडून पावती नंतर देतो अशा अटीवर 5,000₹. ला विकत घेतला आहे असे सांगीतले. त्यानंतर संशयित सिम 9356364319 चे लोकेशन भुम येथे येत असल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून तेथे एक महिला मिळून आली. तिस तिच्या ताब्यात असलेल्या मोबाईल बाबत विचारपुस केली असता तिने सांगितले की माझा मुलगा राजु अर्जुन काळे याने आणुन घरी ठेवला आहे. असे सांगितल्याने राजा अर्जुन काळे याचा शोध घेतला असता तो गोलेगाव ता. भुम येथे मिळून आला. त्यास ताब्यात घेवून नमुद गुन्ह्या बाबत कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी व माझा साथीदार सुभाष श्रीरंग चव्हाण रा. ढोकी ता. जि. धाराशिव असे आम्ही दोघांनी मिळून भुम येथील मोबाईल शॉपी दुकानाचे शटर तोडून दुकानातील बरेच मोबाईल चोरी केले आहेत. असे सांगितल्यावरून पथकाने ढोकी येथे जावून सुभाष श्रीरंग चव्हाण यास ताब्यात घेवून नमुद गुन्ह्या संबंधाने चौकशी केली असता राजा काळे याने सांगीतले प्रमाणे गुन्हा मी व राजा अर्जुन काळे असे आम्ही दोघांनी केल्याचे कबुल केले. त्यावर पथकाने त्या दोघांनी काढून दिलेले मोबाईल हस्तगत केले. नमूद चोरीतील 25 मोबाईल फोन असा एकुण 5,35,206 ₹ किंमतीचा माल हस्तगत करुन पुढील कारवाईस्तव नमूद दोघांना चोरीच्या मोबाईल फोनसह भुम पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे
 सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर खान यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वलीउल्ला काझी, पोलिस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, सचिन गायकवाड सुनील मोरे पोलिस चालक तानाजी शिंदे यांच्या पथकाने केली 


                                                                                                
 
Top