Views


*धाराशिव जिल्हा विशेष शाखेच्या महिला पोलिस नाईक सायमा मोमीन यांचे पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते गौरव* 

*विधानसभा निवडणुकीच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य व अचूक माहिती* 

*धाराशिव पोलीस जिल्हा विशेष शाखेच्या संपूर्ण टीम चे गौरव* 

धाराशिव/ प्रतिनिधी 


राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून अतिशय महत्त्वाची भूमिका असलेले धाराशिव पोलिस प्रशासनाचे महत्त्वाचे विभाग म्हणजे जिल्हा विशेष शाखा या शाखेने विधानसभा निवडणुकीच्या काळातील मान्यवर नेते मंडळी ची प्रचार सभा असो की निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार यांच्या काॅर्नर प्रचार सभा असो की इतर निवडणुक संदर्भातील योग्य व अचूक माहिती ही वरीष्ठांना सादर करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली या कामाची दखल धाराशिव पोलीस जिल्हा विशेष शाखेच्या महिला पोलिस नाईक सायमा इनायत मोमीन यांना धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले 
 या कार्यक्रमाला धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार, तुळजापूर उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख धाराशिव पोलीस जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अमोद भुजबळ, आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ होमकर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी जाधव,श्रीगणेश कानगुडे, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे ग्रेटपोउपनि साळुंखे , पोलीस हवालदार महेश कचरे ,मुंडे ,पोतदार ,पिरजादे, पवार, धाराशिव पोलीस जिल्हा विशेष शाखेचे संपूर्ण कर्मचारी आदी उपस्थित होते 


 
 
Top