*विकासापासून वंचित असणाऱ्या लोहारा तालुक्याला विधानसभेची उमेदवारी?*
लोहारा/प्रतिनीधी
इकबाल मुल्ला
लोहारा तालुका झाल्यापासून विकासापासून वंचित असणाऱ्या लोहारा तालुक्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी अशोकराजे सरवदे यांनी लोहारा येथील शिवसैनिकांच्या वतीने संपर्कप्रमुख काठमोरे आणि ज्येष्ठ नेते बाबा पाटील यांचा शिवसेनेच्या वतीने हातात मशाल देऊन भगव्या सप्ताहाचे स्वागत करण्यात आले. भगवा सप्ताह निमित्त लोहारा येथील आयोजित केलेल्या भगवा सप्ताह निमित्य पक्षाच्या बैठकीत तालुक्यातील मोठ्या संख्येने शाखाप्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते, बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते बाबा पाटील हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून पक्षाच्या संपर्कप्रमुख विलास काटमोरे हे होते तसेच उमरगा येथील शासकीय विश्रामगृह येथे पण झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन सामाजिक सलोखा आबादी ठेवत तालुक्यातील जातीय समीकरणांचा अभ्यास करून प्रभावी आक्रमक वक्तृत्व असणाऱ्यां उच्चशिक्षित निष्कलंक उमेदवारांच्या हातात शिवसेनेची मशाल द्यावी अशी मागणी देखील उमरगा येथे अशोकराजे सरवदे यांनी केली. तालुक्यातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, जिल्हा उपप्रमुख सुरेश अप्पा वाले, बसवराज वरनाळे, रजाकभाई अत्तार, विधानसभा प्रमुख भगवान मामा जाधव, शेतकरी आघाडीचे विजयकुमार नागणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणधीर पवार, तर लोहारा येथील तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहर प्रमुख सलीम शेख, मेहबूब गवंडी, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, महेश लांडगे, पं.स.माजी सभापती विलास भंडारे, शाम नारायणकर, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.