Views


*लोहारा येथील शारिरीक शिक्षण निर्देशक प्रा.नितीन अष्टेकर सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार*



लोहारा/प्रतिनीधी


शंकरराव जावळे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोहारा येथील शारिरीक शिक्षण निर्देशक प्रा.नितीन अष्टेकर हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशराव पाटील होते. तर प्रमुख म्हणुन प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील, संस्थेचे संचालक जनार्दन पाटील, उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने प्रा.नितीन अष्टेकर यांचा शाल श्रीफळ बुफे आणि छ्त्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. व तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने अंकुश शिंदे आणि काकासाहेब आनंदगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या निरोप समारंभ प्रसंगी प्राचार्य शेषेराव जावळे पाटील यांनी प्रा.नितीन अष्टेकर यांच्याबद्धल गौरव उदगार काढून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारमुर्ती प्रा.नितीन अष्टेकर यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगुन संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिवाजी कदम यांनी केले तर आभार डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top