*स्वतः सोबत काही चुकिचे घडत असेल तर विद्यार्थीनींनी गप्प न रहाता पोलिसांना , शाळेतील शिक्षकांना किंवा घरातील सदस्य सांगावे-- आरती जाधव महिला पोलिस उपनिरीक्षक*
धाराशिव/प्रतिनिधी
स्वतः सोबत काही चुकिचे घडत असेल तर विद्यार्थीनींनी गप्प न रहाता पोलिसांना , शाळेतील शिक्षकांना किंवा घरातील सदस्य माहिती द्यावी असे आवाहन पिंक पथक प्रमुख माहिला पोलिस उपनिरीक्षक आरती जाधव यांनी आवाहन ढोकी येथील तेरणा साखर कारखाना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगर, शाळेतील संवाद कार्यक्रमत केले
पिंक पथक पोलिस उपविभागीय कळंब यांच्या वतीने धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगर, शाळेत बुधवार (दि 28) रोजी पिंक पथक प्रमुख माहिला पोलिस उपनिरीक्षक आरती जाधव यांनी स्वतः भेट देत शाळेतील विद्यार्थ्यांनीशी संवाद साधत
गुड टच बॅड टच, महिला विषयी चा कायदा, तसेच पोस्को विषय कायदा बाबत माहिती दिली अडचणी काळात पोलिस त्यांना कशी संरक्षण करु शकतात त्या बदल माहिती दिली अडचणी काळात विद्यार्थीनींने व महिलांनी 80074 57000 पिंक पथक चा मोबाईल नंबर आहे व टोल फ्री क्रमांक 112 हा कायम लक्षात ठेवावे आणि अडचणी काळात संपर्क करावे तत्काळ पोलिस पथक तुमच्या पर्यंत पोहचून तुम्हाला संरक्षण करु शकले
आदी गुन्ह्या बाबत माहिती दिली यावेळी पिंक पथक प्रमुख माहिला पोलिस उपनिरीक्षक आरती जाधव, पोलिस नाईक वैजिनाथ मोहीते, ए.एस. कोलते, ढोकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मोरे, पोलिस काॅन्सटेबल एन. डी.खांडेकर शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते