*उमरगा येथे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
वाहनासह 8,86,400/- रूपये गुटखा, विमल पान मसाला तंबाखू जप्त चालक ताब्यात*
*धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई*
धाराशिव/प्रतिनिधी
धाराशिव गुन्हे शाखेच्या ग पथकाने अवैद्य गुटखा वाहतूक करणारे वाहनावर कारवाई करून महाराष्ट्र शासन प्रतिबंधित केलेली गुटखा शनिवार (दि .24) रोजी उमरगा पोलिस ठाणे हद्दीत गस्ती वर असताना पथकास माहिती मिळाली की महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा वाहतूक होत आहे. या खबर चे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी गंभीर दखल घेत आपल्या पथकास मार्गदर्शन केले व पथकाने औराद पाटी चौरस्ता उमरगा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयावरून वाहन क्रमांक एम.एच. 25 एजे 3021 या वाहनास थांबले व चालकाकडे चौकशी केली असता त्यांने इफतेकार सय्यद तांबोळी रा नारंगवाडी ता. उमरगा जि धाराशिव असे सांगितले त्यानंतर पथकाने वाहनां मध्ये काय असल्याचे विचारणा केली असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनांची झडती घेतली असता वाहनांमध्ये 2 पोते तंबाखू 25 पोते विमल पान मसाला अंदाजे एकूण 6,24,000/-रूपये किंमतीचे गुटखा व तंबाखू पानमसाला वाहनासह 8,86,400/- रूपये किंमतीचे महाराष्ट्र शासन प्रतिबंधित अन्नपदार्थ वाहतूक नेत असल्याचे ताब्यात घेऊन गुटखा,पानमसाला, तंबाखू सह गुन्ह्यात वापरलेले वाहन ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला
सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, पोलिस नाईक बबन जाधवर,अशोक ढगारे, रवी आरसेवाड साईनाथ आशमोड, योगेश कोळी, चालक महेबुब अरब यांनी केली