*जिल्हा न्यायालय कळंब याठिकाणी १० वा आंतरराष्ट्रीय याेग दिन साजरा*
कळंब/प्रतिनिधी
जिल्हा न्यायालय कळंब याठिकाणी तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ कळंब यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जून रोजी १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाप्रमाणे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी निर्देशित केल्याप्रमाणे त्यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते. सदरील योग शिबीरामध्ये जेष्ठ विधीज्ञ श्री. एस. एम. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित न्यायिक अधिकारी, कर्मचारी व विधीज्ञ यांनी विविध प्रकारच्या योगासनाचे प्रात्यक्षिक केले.
सदरील शिबीरासाठी जिल्हा न्यायाधीश-१ तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब श्री. आर. के. राजेभाेसले, सहदिवाणी न्यायाधीश श्री. आर. पी. बाठे, जेष्ठ विधीज्ञ ॲड.एस. वाय. काळे, ॲड. डी. एफ. गायकवाड, ॲड. डी. एन. गोंड, ॲड. श्रीमती एस. आर. फाटक तसेच न्यायालयीन कर्मचारी दिवाणी न्यायाधीश व. स्तर येथील अधीक्षक एस. डी. एखंडे, सहाय्यक अधीक्षक डी. एम. पवार, सहदिवाणी न्यायालय येथील सहाय्यक अधीक्षक एस. के. परदेशी तसेच इतर न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.