Views


*चक तलाठ्याने धरले शेतकऱ्यां साठी औऊत*

*मंगरुळ येथील तलाठी उतरले शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट बांधावर*कळंब /प्रतिनिधी


तालुक्यातील तलाठी सज्जा मंगरूळ येथील तलाठी डि.व्ही.सिरसेवाड पाटील हे नेहमीच आपल्या सज्जाती शेतकऱ्यांसाठी धडपड करतात, सध्या समाधान कारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.मंगरुळ येथील तलाठी सज्जाचे तलाठी श्री.डी.व्ही.शिरसेवाड हे स्वत: प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आधुनिक शेती करायची या बाबत मार्गदर्शन करत आहेत. मंगळवार (दि.१८) रोजी मंगरुळ येथील शेतकरी अनिल रावसाहेब बोंदरे ह्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष बिज प्रक्रिया करून सोयाबीन पिकाची पेरणी केली. तसेच महादेव रितापुरे यांच्या शेतात बि.बि.एफ. द्वारें पेरणी कशी करावी या बाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी एकाच पिकाची लागवड न करता आंतरपीक,बहुपिक, गळीत धान्य पिके,तुर,मुग,उडीद,तीळ,काराळे अशा पिकांची लागवड कशा पद्धतीने करावी. याबाबत पेरणी करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. तर शेतकऱ्यांचे बांधाबाबत व शेतरस्त्याबाबत वादविवाद आपापसात सोडवले. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

 
Top