Views


*१० वर्षांपूवी शेतात खोदलेल्या कुपनलिकेतून (बोअरवेल) मधून मोटारपंपशिवाय पाण्याचे सुमारे २०० फूट हावेत कारंजे*



कळंब/प्रतिनिधी 




 निसगार्ची कृपा झाली तर काय होईल सांगता येत नाही. अशीच कृपा तालुक्यातील इटकूर येथील शेतकऱ्यावर झाली असून, १० वर्षांपूवी शेतात खोदलेल्या कुपनलिकेतून (बोअरवेल) मधून मोटारपंपशिवाय पाण्याचे सुमारे २०० फूट हावेत कारंजे उडत होते.सोमवार (ता.१७) इटकूर परिसरात जोरदार पाऊस झाला होता.

तालुक्यातील इटकूर येथील शेतकरी दिलीप गंभिरे यांनी शेती सिंचनासाठी आपल्या दोन हेक्टर शेतात १० वर्षांपूर्वी साडेचारशे फुट बोअर केल. या बोअरला साडेतीनशे फुट अंतरावर भरपूर पाणी लागले. त्यात त्यांनी साडेसात हॉर्सपावरचे मोटारपंप बसविले. तेव्हा पासून आपल्या शेतीचे सिंचन करुन इतर लोकांच्या शेतीता पाणी पुरवठा करुन त्यांच्या शेतीचीही सिंचन व्यवस्था केली आहे. गावापासून केवळ अडीच किमी अंतरावर शेती असल्याने २०१६ साली कळंब तालुक्यातील गावात प्रचंड दुष्काळ पडला असता संपूर्ण शेतीसाठी याच बोअर मधून पाणी देण्यात येत होते.दरम्यान याच काळात बोअर आटले.त्यामुळे या बोअरचा शेतकरी गंभिरे यानी नाद सोडून दिला.सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता अचानक बोअरवेलमधून आटोमॅटिक पाणी... पाणी बोरअरवेलमधून चक्क २०० फूट पाण्याचे कारंजे जवळपास दोन तास उडत होते.याची व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.पावसाचा लहरीपणा आणि सतत पडणारा दुष्काळ, यामुळे या भागात पाणी टंचाई जाणवत आहे.१० वर्षांपूर्वी बंद पडलेल्या बोअर मधून पाण्याचे फवारे उडत होते. शेतातील पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. अनेक ठिकाणी हजारो रुपये घालवून शेतकरी बोअर घेताना दिसत आहेत.कळंब तालुक्यातील पाण्याची पातळी खोल गेली आहे.५०० फूट बोअर घेवून ही पाणी लागेल याची गॅरंटी नाही.काही बोअर तर त्यापेक्षा जास्त खोलू नेहूनही कोरडे जात आहेत. इटकूर येथील शेतकरी गंभिरे यांची शेती असून त्यांनी पाणी समस्या सोडवण्यासाठी शेतात बोअर घेतला.सोमवारी अचानक बोअर मधून २०० फूट पाण्याचे फवारे उडत होते
 
Top