Views


*हुमेरा मोहम्मद मुल्ला हिचा पवित्र रमजान महिन्याचा पहिला (उपवास) रोजा*    
 
 
कळंब/प्रतिनिधी






 मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान महिना हा मंगळवार (ता.१२) पासुन सुरु झालेला असुन पहिल्याच दिवशी पहिल्यांदाच कळंब येथील गणेश नगर भागात राहत असलेली दहा वर्षीय सुमारास हुमेरा मोहम्मद मुल्ला वय १० वर्ष या चुमुकलीने पहाटे सहेरी करुन उपवासाचा (रोजा) धरला. दिवसभर काहीही न खाता पिता सायंकाळी उपवासाचा (रोजा) ईप्तार करून रोजा पूर्ण केला याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हुमेरा मुल्ला या १० वर्षीय बालिका नी रमजानच्या पवित्र असा एक रोजा (उपवास) पूर्ण केला आहे. मुस्लिम समाजात रमजान या पवित्र सणाला महत्व आहे. त्या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करीत असतात. कुराण व पाच टाईम नमाज पडला जात असतो. 

समाज संस्कृती व संस्कार हे लहानपणी मुलांना दिले तर टीकून रहातात. या धर्माच्या शिकवणीनुसार या दोघांनी अगदी कमी वयात पहिलाच रोजा धरला होता. तो पूर्ण झाल्याने तीचे आई, वडिल मुस्लिम बांधवाकडून, मौलाना, धर्मगुरु, नातेवाईकांकडुन कौतुक केले जात आहे.

 
Top