Views



*तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात तर पोलिस प्रशासन कैद करते कॅमेऱ्यात*

*प्रेमीयुगुलांवर पिंक पथकाची नजर*

*शहरात प्रेमीयुगुलांचे वाढता प्रस्ताव*


धाराशिव/प्रतिनिधी 



जिल्ह्यातील भूम शहरात प्रेमीयुगुलां वर पोलिस प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे शहरातील महाविद्यालय, शाळे च्या सीसीटीव्ही कॅमेरे बघून तरुण तरुणी वर पिंक पथक नजर ठेवून आहे 

याबाबत माहिती अशी की भुम शहरात शाळेय शिक्षण, महाविद्यालय शिक्षण, तसेच क्लासेस साठी ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी रोज शहरात येणे जाणे करत आहेत. अल्पवयीन व किशोरवयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी हे कळत नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्या बळी पडतात नंतर शिक्षणावर पाणी टाकून आपले शाळा व महाविद्यालय बुडवून आपल्या प्रेमी- प्रेमिकांच्या सोबत शहरातील आलम प्रभू देवस्थान परिसरात, तसेच स्वयंघोषित लव्ह पाॅईंट इतरत्र च्या ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. यातुन एकमेकांना फसवणूक करण्याचा प्रकार घडत आहे. प्रेम भंग झाल्याने प्रेमीयुगुलांचे आत्महत्या करण्याचा प्रकार घडू शकते तसेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचाराची ही घटना घडू शकते आशा प्रेमीयुगुलां पोलिस प्रशासनाने अटकाव करण्यासाठी व 
याचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून अप्पर पोलिस अधीक्षक गैहर हसन तसेच भूम उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ मार्गदर्शनाखाली पिंक पथक हे प्रेमीयुगुलां वर करडी नजर ठेवून आशा तरूण तरूणी ला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात घेऊन जाऊन त्याचे समुपदेशन करत आहेत. तसेच तरुण तरुणी यांच्या पालकांना ही पोलिस ठाण्यात बोलावून आपल्या पाल्याचे ताबा देऊन त्यांच्या लक्षा देण्याचे सांगत आहेत. सदर कार्यवाही ही भुम पोलिस पिंक पथक चे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक भागवत गाडे, महिला पोलिस नाईक प्रतिभा मते, पोलिस काॅन्स्टेबल राम नागटिळक हे करत आहेत




तरुण - तरुणी ने आपले स्वतः चे करिअर बनवावे प्रेम, मित्र, मैत्रीणी अशा नादी न लागता स्वतः च्या करिअर कडे लक्ष द्यावे. आणि आपल्या आई वडिलांना आपल्याला शिक्षणासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव ठेवून शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे व आई वडिलांची अब्रू ठेवत त्यांच्या कष्टाचे चिज करावे.


प्रतिभा मते

महिला पोलिस नाईक पिंक पथक भुम



 
Top