Views


*अमर चोंदे ,अश्रुबा कोठावळे, आकीब पटेल ,यांना आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार जाहीर.*                     

धाराशिव (प्रतिनिधी)

 प्रतिवर्षी पुरस्कार सेवा समिती कळंबच्या वतीने ६ जानेवारी दर्पण दिना निमित्त कळंब तालुक्यातील सामाजिक, आरोग्य ,क्रीडा ,शोध वार्ता ,या विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो गेली १४ वर्ष हे पुरस्कार देण्यात येत असून आज पर्यंत ३८ पत्रकारांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे पुरस्कार सेवा समिती कळंब चे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी यावर्षीचे पुरस्कार जाहीर केले असून पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये अमर भारत चोंदे (तालुका प्रतिनिधी ( दैनिक समय सारथी ,प्रजापत्र) आश्रुबा अंकुश कोठावळे (तालुका प्रतिनिधी दैनिक अक्षराज) आकिब नय्युम पटेल (संपादक महाराष्ट्र प्राईम न्यूज) यांचा समावेश आहे दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता संत ज्ञानेश्वर बालकाश्रम तांदुळवाडी रोड येथे मान्यवर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुरस्कार सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top