Views


*भारतीय विकासात महिलांचे योगदान महत्त्वाचे :- प्रा.डॉ.जगदीश देशमुख*धाराशिव /प्रतिनिधी

 शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त बुधवार (दि 03) रोजी सकाळी,11.00 वाजता भारतीय लोकशाही आणि स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या पूजन करण्यात आले.यावेळी प्रा.डॉ.जगदीश देशमुख (वसंतराव काळे महाविद्यालय) बोलत होते.   
सन २०२३-२४ या नियमित  उपक्रमांतर्गत राज्यशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले युवती मंच  यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे 
आयोजन करण्यात आले होते. 
        व्यासपीठावर उपप्राचार्य अध्यक्षस्थानी डॉ.हेमंत भगवान,तर प्रमुख उपस्थिती मध्ये अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर उपस्थित होत्या. 
पुढे देशमुख म्हणाले," प्राचीन भारतीय इतिहास पाहताना आपल्या अनेक स्त्रियांनी मौलिक कार्य केले आहे.  सावित्रीबाई फुले आणि जिजाऊंच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून आजच्या महिलांनी प्रगती केली पाहिजे. तसेच भारतीय संविधानातील प्रस्तावना , मुलभूत अधिकार, स्थानिक स्वराज्य संस्था आदींचे संदर्भ देऊन भारतात स्त्री पुरुष समानता स्वातंत्र्यापासून आजतगायत कशी रुजली आहे,तसेच भारताच्या प्राचीन काळापासून ते आजतागायत विकासात महिलांचे योगदान कसे राहिले आहे याविषयी सविस्तर माहिती दिली."यावेळी सावित्रीबाई फुले युवती मंचच्या 2023-24 शैक्षणिक वर्षांमध्ये विविध उपक्रमामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक म्हणून प्रा सरस्वती बोंदर यांना पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागप्रमुख. डॉ. नामानंद साठे यांनी केले.तर आभार प्रा.डॉ. मीनाक्षी जाधव यांनी मानले . यावेळी प्रो.दादाराव गुंडरे, प्रो.दीपक सूर्यवंशी, डॉ. ईश्वर राठोड, डॉ.हरीभाऊ पावडे, डॉ. वर्षा सरवदे, प्रा.सरस्वती बोंदर, डॉ.संदीप महाजन, डॉ.श्रीकांत भोसले, प्रा.दीपक वाळके,अरविंद शिंदे,डॉ.समाधान चंदनशिवे, प्रा.शाहरुख शेख, श्रीमती जया पांचाळ, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हनुमंत जाधव, प्रकाश गायकवाड, संतोष मोरे,संदीप सूर्यवंशी, आदित्य मडके यांनी परिश्रम घेतले.

 
Top