नीट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार*
कळंब/प्रतिनिधी
तालुक्यातील नीट 2023 च्या परिक्षेत यशवंत भावी डॉक्टरांचा सत्कार-राजेंद्र बिक्कड सर मित्र परिवाराचा उपक्रर सत्कार.कळंब.रवीवार(दि.18) रोजी करण्यात आले श्री राजेंद्र बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने सन 2023 मध्ये720 पैकी 500 व 500 पेक्षा अधिक गुण घेतलेल्या भावी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ रमेश जाधवर होते.मा.श्री.संतोष राऊत सहाय्यक आयुक्त मंत्रालय मुंबई यांच्या शुभहस्ते गुणवंतांचा सत्कार स्टेटसस्कोप,शाल, श्रीफळ, पुष्पहार, बुके देऊन करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हभप महादेव महाराज आडसुळ, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक अतुल गायकवाड, कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे पोलिस, डॉ अभिजित जाधवर , शिवाजी गिड्डे, विठ्ठल माने, संतोष भोजने, गणेश कोठावळे,प्रा.डाॅ.साकोळे, बाबासाहेब सारूक उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संतोष राऊत यांनी भविष्यात आपण समाजाच काही तरी देण लागत या भावनेने काम करण्याचा सल्ला दिला, डॉ रमेश जाधवर यांनी गुणवंताच व पालकांच अभिनंदन करून भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी हभप महादेव महाराज आडसुळ,अतुल गायकवाड, रामहरी चाटे, विठ्ठल माने यांनी देखील मार्गदर्शन केले.या प्रसंगी अथर्व श्रीकृष्ण घुले 681,प्रणव राजेश जाधव 646, स्वानंदी रामेश्वर मते 642,शब्दसृष्टी शशिकांत जाधवर 630,तेजेस लहु पवार 619,पार्थ रघुनाथ पौळ 605, ऐश्वर्या युवराज सुरवसे604, राजवर्धन सुशिल हूंबे 586, सुशांत रविकिरण कुलकर्णी 575,आनुजा केशव खामनेकर 557, कृष्णा सागर भडंगे 556, सानिका धनंजय आडमुठे 553,प्रतिक गजानन पाटील 544, क्रांती राजेंद्र ठोंबरे 537, आदित्य बळीराम बोबडे 504 या गुणवंतांचा झाला सन्मान.विशेष सत्कार म्हणून प्रदिप गौतम जाधवर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अस्सिटंट मॅनेजर या पदावर प्रमोशन झाल्याबद्दल,सुरज विठ्ठल माने याचा प्रवेश देशातील नामांकित आय आय टी खरगपुर येथे मास्टर ऑफ आर्किटेक्चर साठी झाल्याबद्दल,यश सचिन बोंदर याने एनएसएसई परिक्षेत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल करण्यात आला.या सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर पेशाच प्रतिक म्हणून स्टेटसस्कोप डॉ रमेश जाधवर यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक राजेंद्र बिक्कड, सुत्रसंचलन उपक्रमशिल शिक्षक महादेव खराटे, आभार प्रदर्शन अशोक बिक्कड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सचिन बोंदर, सचिन (पिनु)जाधवर, सुर्यकांत जाधवर,निशिकांत आडसुळ,राज बिक्कड, रामहरी मुंडे, दिलीप डोईफोडे, बन्सी मोराळे,सुरेश बिक्कड यांनी परिश्रम घेतले.