Views


*आषाढी एकादशी निमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारकऱ्यांसाठी टोल फ्री*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


आषाढी एकादशी निमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारकऱ्यांसाठी टोल फ्रीच्या निर्णयामुळे पंढरपूर कडे जाणाऱ्या वाहनांनी पुरेपूर लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. 

नुकत्याच पंढरपूर ला जाणारी वाहने यांना जागोजागी टोल द्यावा लागत असत परंतु विठोबाच्या दर्शनाला जाणारे भाविक भक्त हे सर्वसामान्य जनता असल्याने आपल्या खाजगी वाहनाने पंढरपूर कडे जाताना टोल छा नाहक खर्च होत होता, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुख्यमंत्री यांच्या आदेशावरून टोल दर्शनाला जाणऱ्या वाहनांना टोल फ्री केल्यामुळे भाविक भक्तामधून आनंद व्यक्त केला जात आहे. 

 येडशी येथील टोल नाक्यावर महामार्ग पोलीस अधिकारी 
महामार्ग पोलीस केंद्र उस्मानाबाद यांच्या कडून वारकऱ्यांना टोल फ्री ची चांगलीच सेवा मिळत आहे. राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे महामार्ग पोलीस केंद्र उस्मानाबाद हद्दी मधून प्रवास करणाऱ्या वारकरी व त्यांचे वाहनांना ता. १६ रोजी पासून आजतागायत पर्यंत एकूण एकशे दहा टोल फ्री पासचे वाटप करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे येडशी येथील टोल नाक्यावरून जाणाऱ्या प्रत्येक चार चाकी वाहन धारकांना ते पंढरपूर कडेच दर्शनाला जात असल्याची खातरजमा अधिकारी व कर्मचारी करत आहेत जेणेकरून वारकऱ्यांना या टोल फ्री चा पुरेपूर फायदा होईल. 

सहाय्यक पोलीस निरिक्षक निशिकांत शिंदे यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल खराडे, जगन्नाथ गुंड, किशोर कोळी, अमोल कलशेट्टी, पोलीस नाइक मनोज भिसे, पोलीस शिपाई राजेंद्र मस्के, रविराज बारकुल, बालाजी तोडकर आदी कर्मचारी अहोरात्र वारकऱ्यांना सेवा देत आहेत. 
या टोल फ्री मुळे किमान पाचशे ते एक हजार रुपयांची बचत होत असल्याचे भाविक भक्तांकडून बोलले जात आहे.
 
Top