Views




*मांडव्यात गांजासह तलवार, सत्तुर जप्त तर तुळजापूर शहरात चक्री व्हिडिओ गेम जुगार अड्ड्यावर छापा*

*सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांची कार्यवाही* 



उस्मानाबाद/प्रतिनिधी


सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या पोलिस पथकाने वाशी तालुक्यातील मांडवा व तुळजापूर शहरात छापे टाकून पोलिसांनी केलेल्या दोन्ही छापे कार्यवाहीत 3 लाख 2 हजार रूपयांचे मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही 1जून रोजी उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या पोलिस पथकाने केली. याप्रकरणी वाशी व तुळजापूर पोलिस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांन कडून मिळाली अधिक माहिती अशी की वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा येथील संजय सुभाष पवार याच्या रहाते घरी गांजा अंमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती माहिती पोलिसांना मिळाली. मांडवा येथील संजय सुभाष पवार याच्या घरी छापा मारला असता संजय सुभाष पवार (वय.28) , सचिन सुरेश शिंदे (वय.17), यांच्या घरात 58 हजार 480 रुपये किमतीचे 5 किलो 848 ग्राम गांजा, एक तलवार, चार सत्तुर, विदेशी दारू असे एकूण 1 लाख 13 हजार 950 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघा जणांना विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 दरम्यान तुळजापूर शहरात चार ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या पोलिस पथकाने छापे टाकले असून. तुळजापूर शहरातील जुने बसस्थानक गोलाई चौकात चक्री व मटका जुगार , व्हिडिओ गेम मशिन नावाचे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती वरुन पोलिसांनी छापा शुक्रवारी (दि.02) रोजी टाकला यात जोतीबा हाॅटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या रूममध्ये व्हिडिओ गेम नावाचे जुगार खेळत व खेळवित असताना दोघे मिळून आले. त्यांच्या कडून 25 हजार 600 रूपये किंमतीचे जप्त केला तसेच रंगराज लाॅज पाठीमागे पत्र्याच्या रूममध्ये चक्री नावाचे जुगार खेळत व खेळवित असताना तीन जण मिळून आले त्यांच्या कडून 64 हजार 500 रूपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच जुने बसस्थानक समोर कोकाटे पान शाॅप व कॅंटीन मध्ये कल्याण मटका नावाचे जुगार खेळत असताना एक जण मिळून आला. त्यांच्या कडून 14 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुने बसस्थानक समोर जंगदबा ट्रॅव्हल्स पत्र्याच्या रूममध्ये चक्री नावाचे जुगार खेळत असताना चार जण मिळून आले. त्यांच्या कडून 83 हजार 790 रुपये चे मुद्देमाल जप्त करण्यात आला

दोन्ही कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे, पोलिस उपनिरीक्षक पुजरवाड, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती फंड , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय अतकरे, कराळे महिला पोलिस नाईक प्रतिभा मते, पोलिस नाईक सादेक शेख, नवनाथ खांडेकर, श्रीकांत भांगे, शाहरुखखाॅं पठाण, यादव महिला पोलिस नाईक चाटे, पोकाॅ करवर यांनी केली 
 
Top