Views


*कळंब येथे पोलिस ठाण्यात शेंद्रिय शेती विषयक बैठक संपन्न!!*                            



कळंब/प्रतिनिधी 

गुरवार (दि. 4) रोजी कळंब पोलिस ठाण्यात उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक मा.अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हर्षल जैन आंतरराष्ट्रीय शेंद्रिय शेती निरिक्षक डाॅ. माणसी पाटिल यांनी शेतकर्यासाठी ऑर्गनिक प्रमाणपत्र कशापध्दतीने हस्तगत करावे याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच डाॅ. माणसी पाटिल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रासायनिक अन्नद्रव्य ‌सेवन केल्यामुळे होणार्या आरोग्यावर परिणाम व त्यातुन होणारा आर्थिक तोटा व आपण कशापध्दतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि शेंद्रिय शेती विषयक फायदे व मार्गदर्शन या बाबत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कळंब पोलिस स्ठेसनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सुरेश साबळे यांनी पण उपस्थित शेतकऱ्यांना शेंद्रिय शेती कशी करावी याविषयी मार्गदर्शन करुन शेंद्रिय शेती करण्याचे आव्हान केले तसेच कन्हेरवाडीचे सरपंच ॲड रामराजे जाधव यांनी पण मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी राजेंद्र मिटकरी, उमेश गायकवाड, विशाल मिटकरी,संजय सावंत, धनंजय जगताप,ग्रा.प.सदस्य उदय मोरे, विजयकुमार कवडे,नेताजी सुब्राव कवडे, महादेव गोविंद कवडे,व्हाईस ऑफ मिडियाचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष तथा दै.समय सारथी कळंब तालुका प्रतिनिधी अमर चोंदे,दै.धाराशिव नामा कळंब तालुका प्रतिनिधी तथा व्हाइस ऑफ मिडियाचे कळंब तालुका उपाध्यक्ष रामराजे जगताप व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उपस्थित सर्व मार्गदर्शक आणि शेतकऱ्यांचे कळंब पोलिस स्ठेसनच्या वतीने आभार पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे यांनी मानले

 
Top