Views


*वाहनधारकांनो सावधान , दुकानापुढे किंवा नो पार्किंग मध्ये गाडी पार्क केल्यास ऑनलाईन दंड भरावा लागणार!*

कळंब / प्रतिनिधी

शहरातील सर्व नागरिकांना व व्यापाऱ्यांना कळवण्यात  येते की शहरातील आपले दुकान समोर किंवा घरासमोर एखादे वाहन वाहतुकीचा अडथळा करेलकिंवा नो पार्किंग मध्ये अशा रितीने बऱ्याच वेळा पासुन उभे असेल किंवा पार्कींग केले तर संबंधित नागरिकांनी  8369907421 या नंबरचे व्हॉटस अॅप वरती सदर वाहनाचा फोटो गाडीचा नंबर स्पष्ट दिसेल अशा पध्दतीनेकाढुन पाठवणे .  आपण पाठवलेल्या फोटो वरुन नमुद वाहनावर शहर वाहतुक शाखे तर्फे ऑनलाईन पध्दतीने दंड आकरण्यात येईल .  जेणेकरुन शहरातील सर्व सामान्य नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळा होणार नाही.यासाठी वाहनधारकाने आपली वाहने दुकानदाराला किंवा नो पार्किंग मध्ये बारा च  वेळ  उभा करू नयेत उभा केल्यास आपणाला ऑनलाइन पद्धतीने दंड भरावा लागणार आहे . ज्या दुकानदारांना नागरिकांना अशा वाहनाचा त्रास होईल अशा नागरिकांनी संबंधित नंबर वरती संपर्क साधावा असे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे .

 
Top