Views


*यात्रेत चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या 61 पुरुष व 24 महिलांना ताब्यात घेत प्रतिबंधक कार्यवाही*


*पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या सह कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी. एम रमेश डोळ्यात तेल घालून जातीने हजर*


   कळंब/प्रतिनिधी 

    तालुक्याचे आराध्य दैवत येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेस बुधवार (दि. 06) पासून सुरूवात झाली असून शुक्रवार ( दि 07) रोजी चूनखडई वेचण्याचा महत्त्वाचे कार्यक्रम झाला यावे राज्यासह परराज्यातील येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येरमाळा येथे दहा ते पंधरा लाख भाविक दाखल झाले आहेत याच भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे दागिने, मोबाईल, ईतर मौल्यवान वस्तू चोरी करण्याच्या उद्देशाने यात्रेत फिरणाऱ्या 61 पुरुष व 24 महिलांना यात्रा बंदोबस्तात असलेल्या पोलीस पथकाने ताब्यात घेत त्यांच्या विरोधात सी. आ. पी. सी कलम 109 प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली तसेच जबरी चोरी करणारे 09 जणांना रंगेहाथ किमती माला सह पकडण्यात आले व येरमाळा पोलीस ठाण्यात भादवि कलम 392 प्रमाणे 09 गुन्हे जबरी चोरीचे दाखल करण्यात आले तस 01 गुन्हा भादवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला
 सदर कार्यवाही ही धाराशिव (उस्मानाबाद) पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आली आहे या पथका मध्ये पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे, गंगाधर पुजरवाड, जगताप, पोहेकाॅ सुनील कोळेकर, पोलिस नाईक तिघाडे, पोकाॅ. शिंदे, थाटकर, शिंदे, जाधव, माळवे, रविकुमार कोरे, तसेच पोलीस पाटील, व होमगार्ड यांचे सहभाग आहे सोबतच धाराशिव (उस्मानाबाद) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन पथक कार्यरत आहे यात्रेत चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिस प्रशासन नजर ठेवून आहे अस कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम.रमेश यांनी सांगितले आहे 


चौकट


आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण येरमाळ्या येथील येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रेस गुरुवार ( दि. 06) ते मंगळवार (दि.11) रोजी येरमाळा येथे यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते या यात्रेस देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविक दाखल झाले आहेत. येडेश्वरी देवीची यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी धाराशिव ( उस्मानाबाद) चे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत, कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश हे डोळ्यात तेल घालून जातीने हजर राहून कायदा व्यवस्थेत वर नजर ठेवून आहेत

यात्रेच्या बंदोबस्तासाठी 36 पोलिस अधिकारी, 258 पुरूष पोलिस कर्मचारी, 63 महिला पोलिस कर्मचारी, 01 एस. आर. पी कंपनी सोलापूर, 02 आरसीपी प्लॅटुन व 500 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 
 
Top