Views


*राशनचे ११६ पोते तांदूळ सह टॅम्पो पोलिसांच्या ताब्यात*

कळंब/प्रतिनिधी 


शहरातील मार्केट यार्ड भागातील एका अडत दुकानात बुधवार (दि.१५) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कळंब पोलिसांनी धाड टाकून रेशन चे तांदूळ ११६ पोते जप्त केले. या वेळी शंकर सांवत यांच्या वर कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे


कळंब येथील मार्केट यार्ड भागातील तुळजाभवानी ट्रेंडिग कंपनी ॲन्ड आडत दुकानासमोर रेशनचा तांदूळ अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांना मिळाली. याच्या आधारे धाराशिव उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पथक तयार करून धाड टाकली यावेळी तांदुळाची ११६ पोते भरलेले टॅम्पो क्रं M.H 24 .AU 0041 मध्ये अंदाजे किंमत 10,4400/- रुपये चे तांदूळ सह 3,00,000/- रुपये किंमतीचे टॅम्पो असा एकूण 4,04,400 रूपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला.

सदर कार्यवाही ही धाराशिव ( उस्मानाबाद) चे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांच्या नेतृत्वाखालील कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील पोलिस उपनिरीक्षक पूजरवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय अतकरे, महिला पोलिस नाईक प्रतिभा मते, पोलिस नाईक सादेक शेख , शिवाजी राऊत, नवनाथ खांडेकर, श्रीकांत भांगे, राजू मुळे, हनुमंत चव्हाण यांनी केली 
 
Top