Views


*अमर चाऊस यांना पुरस्कार जाहीर*

कळंब/प्रतिनिधी


शहरात कळंब मध्ये प्रथम शिवज्योत आणणारे, प्रत्येकाच्या मदतीला धावुन जाणारे, कोरोना काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता रुग्णांना इतर दवाखान्यात स्वतः गाडी चालवून घेऊन जाणारे, सामाजिक कार्यकर्ते,. अमर (बाबू) चाऊस यांना कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा " शिवभूषण " पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून,सोमवार दिनांक १३.२.२०२३ रोजी पत्रकार भवन येथे ५:३० वाजता , पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी सांगितले.
 
Top