Views




*छत्रपती शिवराय जगाचा प्रेरणास्रोत - शाहीर साळुंके* 

कळंब/प्रतिनिधी 


 छत्रपती शिवराय हे अखंड जगाचे प्रेरणास्रोत आहेत त्यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा जागर जयंतीच नाही तर प्रत्येक दिवशी व्हायला हवा असे उदगार प्रसिद्ध शिवशाहीर संतोष साळुंके यांनी शहरात शिवसेवा तालीम संघ आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना केले.
       या व्याख्यानमालेची सुरवात छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रजवलन करून करण्यात आली. यावेळी शिवसेवा तालीम संघाचे प्रमुख तथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रवि नरहिरे, पत्रकार बालाजी आडसुळ, ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी निरफळ, मुसतान मिर्झा, बालाजी सुरवसे, दिलीप गंभीरे, परमेश्वर पालकर, मंगेश यादव, रमेश अंबिरकर, अकीब पटेल, माधवसिंग राजपूत, प्रदिप यादव संदीप कोकाटे आदी उपस्थित होते. 
            यावेळी शाहिर साळुंके यांनी छत्रपती शिवराय यांच्या कर्तुत्ववाचे पोवाडे गायिले यामध्ये अफजलखानाचा वध, पाळणा, जय जय महाराष्ट्र माझा या पोवाडे व गितांनी कळंबकराना भुरळ घातली. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजनमोतसव समितीचे अध्यक्ष अतुल कवडे, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, गोविंद चौधरी, सचिव रोहन पारख, संतोष लांडगे, प्रा संजय घुले, श्याम खबाले, प्रताप मोरे व तालीम संघाचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर पालकर, प्रा महादेव गपाट यांनी केले तर आभार प्रा संजय घुले यांनी मानले.

 
Top