Views


*इंन्स्टाग्राम वर ओळख निर्माण करून बलात्कार : स्वारगेट पोलीसांकडून आरोपीस उस्मानाबाद येथून अटक*


पुणे:-

इंन्स्टग्रामवर (Instagram) फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सतत मेसेज करून तरुणीशी जवळीक निर्माण करून बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपीने पिडीत मुलीला इंन्स्टाग्रामवरुन फ्रेंड रिक्वेस्ट व मेसेजेस पाठवुन ओळख निर्माण केली. ओळख झाल्याने तिला गोड बोलून भेटण्यासाठी बोलावून जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापीत करून पिडीत मुलीला न कळता तीचे अश्लिल फोटो काढून सदरचे फोटो इंन्स्टाग्राम अकाऊंटवरती व पिडीत मुलीचे काका यांचे वॉट्सअपवरती पाठवून पिडीत मुलीची बदनामी केल्याने, सदरच्या पिडीत मुलीने तक्रार दिल्याने स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २६३/२०२२ भा.दं.वि. कलम ३७६ (२) (एन), ५०६, माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी), ६७, ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयातील आरोपी नामे संजय ऊर्फ ज्ञानेश्वर बाळु सितापे, याचा पत्ता अपूर्ण असलेने त्याचे मोबाईल वरुन तांत्रिक विश्लेषन करुन त्याचा शोध घेणेकामी एक टिम तयार करुन त्याचे जसे लोकेशन प्राप्त होईल त्याप्रमाणे सदर ठिकाणी जावुन त्यास उस्मानाबाद येथुन ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव संजय ऊर्फ ज्ञानेश्वर बाळु सितापे, वय- १९ वर्षे, रा. चिंचोली सोन अवासा, ता. औसा, जि. लातूर असे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दि.२२ रोजी अटक करणेत आली.

सदरची कारवाई संजय डहाळे, अपर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परि-२, पुणे शहर, सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर, अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर व सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, अश्विनी बावचे, पोलीस उप-निरी. येवले व तपासपथकातील अंमलदार तारु, फिरोज शेख, भरगुडे, गायकवाड, चव्हाण, गोडसे, खेंदाड, अनिस शेख, महामुलकर यांनी त्याचा शोध घेवून त्यास अटक केलेली आहे.
 
Top