*व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, कार्याध्यक्ष रहिम शेख यांनी जाहीर केली.
पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी व्हाईस ऑफ मीडिया ही पत्रकार संघटना काम करते. या संघटनेकडून मुल्याधारित पत्रकारिता कायम राहावी, यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. संघटनेच्या विस्तारासाठी जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे व कार्याध्यक्ष रहिम शेख यांनी जाहीर केलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः जिल्हा कार्याध्यक्ष अमर चोंदे, उपाध्यक्ष समीर सुतके, उपाध्यक्ष नीळकंठ कांबळे, उपाध्यक्ष रवींद्र लोमटे, प्रकाश काशीद, सरचिटणीस अविनाश काळे, सहसरचिटणीस अजित चंदनशिवे, कोषाध्यक्ष सुनील बडूरकर, कार्यवाहक बालाजी बिराजदार, कार्यवाहक कुंदन शिंदे, संघटक नारायण गोस्वामी, संघटक भिकाजी जाधव, आयुब शेख, किशोर माळी, प्रवक्ता अमोल गाडे, प्रसिद्धीप्रमुख शितलकुमार वाघमारे, सदस्य आकाश नरोटे, प्रमोद राऊत, गो. ल. कांबळे, प्रतीक भोसले, रुपेश डोलारे, राहुल कोळी.
नवनियुक्त पदाधिकार्यांचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, कार्याध्यक्ष संजय आवटे, उपाध्यक्ष मंदार खणसे, धर्मेंद्र जोरे, डॉ. नरेंद्र बोरले-पवार, सरचिटणीस राहुल पांडे, कोषाध्यक्ष चिंतन थोरात, कार्यवाहक शंतनू डोईफोडे, संघटक सुधीर लंके, परवेज खान, अश्विनी डोके तसेच मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी अभिनंदन केले आहे.