Views




*मराठा आरक्षण महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात...*
*रांगोळी मधून जनजागृती, शंभर गावात बैठका...*

 कळंब..... विलास मुळीक 
...............
मराठा आरक्षण मोर्चा ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महामोर्चाच्या दिवशी शहरात वाहनांची कोंडी होऊ नये, या करीता एस.टी महामंडाळा सह खाजगी वाहने शहराच्या बाहेर वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चा १९ सप्टेबर सोमवार रोजी काढण्यात येणार आहे.. 
याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.विशेष म्हणजे मोर्चाची जनजागृती करण्यासाठी महिला सरसावल्या आहेत. महिला
घरोघरी जाऊन आरक्षणाच्या
महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. रांगोळी च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आज पर्यंत शंभर गावात बैठका घेण्यात आलेल्या आहेत.
     महामोर्चाच्या अनुषंगाने शहरात वाहनांची कोंडी होऊ नये, म्हणून केजकडुन येणाऱ्या वाहनांची पार्किंग बायपास रोड वरील १०१ नगर जवळील मैदान, रणसम्राट क्रीडांगण येथे करण्यात आली आहे. बार्शी रोडवरुण येणाऱ्या वाहनांची व्यवस्था पंचायत समिती समोरील पोलिस मैदानावर करण्यात आली आहे. तर ढोकी रोडकडुन येणाऱ्या वाहनांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, केंब्रिज विद्यालय व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर क्रीडा संकुल डिकसळ येथे पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे. 
मराठ आरक्षण महामोर्चाची सुरुवात ढोकी रोडवरील विद्याभवन हायस्कूल मैदानातून होणार आहे, ढोकी रोड मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी रोड या मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे मोर्चा जाणार आहे, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर नगर पालिकेच्या क्र . १ च्या मैदानात सभा होणार आहे. व्यासपीठावर महिलांना प्राधान्य आहे.

चौकट...


मोर्चाचे निवेदन देण्या साठी पाच मुली जाणार आहेत. तर मुख्य व्यासपीठावर सात मुलींचे भाषने होणार आहेत. मोर्चा मध्ये स भागी पहिल्यांदा मुली,नंतर महिला,व पुरुष मंडळी रहाणार आहे. रस्त्यावर मोर्चे करा साठी मुस्लिम समाज बांधवांनी पीण्याचे पाण्याची सोय केली आहे.


चौकट...

या मोर्चाच्या तयारी संदर्भात पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलिस अधिक्षक एम.रमेश, पोलीस निरिक्षक यशवंत जाधव यांनी पाहणी करून , मोर्चा संदर्भात बैठक घेतली. या वेळी समाज बांधव उपस्थित होते . 


चौकट 

प्रवासी बस वाहतूक मार्गात बदल!
महामोर्चाच्या दिवशी सोमवार असल्याने कळंब शहरात आठवडी बाजार भरतो त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे ही गर्दी लक्षात घेऊन व प्रवाशांची हेळसांड होऊ नये यासाठी एस .टी . महामंडळाने बार्शी रोड वरती बार्शी व पारा या मार्गावर जाणाऱ्या सर्व बसेस या पोलीस ठाण्याच्या मैदानातून मोर्चा संपेपर्यंत तिथूनच सुटतील तसेच उस्मानाबाद आणि लातूर मार्गावर धावणाऱ्या बसेस या ढोकी नाका येथून नियमित येजा करतील या दोन्ही मार्गावरच्या बसेस सकाळी नऊ ते मोर्चा संपेपर्यंत बस स्थानकात येणार नाहीत तरी प्रवाशांनी या बदलाचा माहिती घेऊन प्रवास करावा अशी माहिती आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांनी दिली आहे .

 
Top