Views


*मराठा सेवा संघाचा 32 वा वर्धापन दिन कळंब येथे उत्साहात साजरा*


कळंब/प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड चा वतीने मराठा सेवा संघा चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, मराठा सेवा संघाची स्थापना होऊन आज रोजी ३2 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पी.एस. शिंदे सर यांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघ कळंब तालुका सचिव अरविंद शिंदे, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुलभैया गायकवाड,जिल्हा अध्यक्ष अँड. तानाजी चौधरी, कामगार आघाडी जिल्हाअध्यक्ष दत्ता कवडे विभागीय उपाध्यक्ष विलास गुंठाळ, रंजीत पवार, अमोल गायकवाड, अशोक कांबळे,धनंजय शिंदे, संतोष कदम, अभय जाधव आदी जन उपस्थित होते.
 
Top