Views


*भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त लोहारा तहसील कार्यालयाच्या सभागृहात विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत लाभ देण्यासाठी एकदिवसीय विशेष शिबिर कॅंप संपन्न*लोहारा/प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने लोहारा तहसील कार्यालयाच्या सभागृहात विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत लाभ देण्यासाठी दि.10 ऑगस्ट 2022 रोजी एकदिवसीय विशेष शिबिर कॅंप घेण्यात आला. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

यावेळी शिधापत्रिका धारकांनी आपल्या कुटुंबातील मयत व्यक्ती, विवाह नंतर स्थलांतरीत व्यक्ती, कामानिमित्त ईतर ठिकाणी स्थलांतरीत झालेल्यांनी अर्ज करुन आपले नांवे कमी करुन घ्यावेत, असे आवाहन तहसिलदार संतोष रुईकर यांनी करुन संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य, अशा लाभाच्या विविध योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी नायब तहसीलदार माधव जाधव, अव्वल कारकून यु.ई.मुदीराज, बालाजी सगर, बस्वराज वाळके, लिपीक देवगिरे, कोतवाल अभिजीत गायकवाड, आनंद राठोड, आदि, उपस्थित होते. या शिबिरात अपंग, एकल महिला, कोव्हीड मयत कुटुंबातील लाभार्थी, आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे अर्ज भरुन घेऊन मंजुर करण्यात आले. 
शिधापत्रिकेतुन नाव वगळणे, नाव समाविष्ट करणे यासाठी अर्ज घेऊन व अंत्योदय, अन्न सुरक्षा योजना, एपीएल योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना अर्ज भरुन घेऊन दुय्यम शाधापत्रिका देण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना यांना सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून विविध नमुन्यात अर्ज घेऊन लाभ मंजुर करण्यात आला. 

यावेळी कृत्रिम पाय बसविण्यात आलेले कानेगाव येथील अपंग लाभार्थी काकासाहेब चौगुले, कोव्हीड मध्ये मयत झालेले माळेगाव येथील वारस कलावती पाटील संजय गांधी योजनेतून व सरुबाई कुंभार यांना श्रावण बाळ योजनेतुन लाभ मंजुर करण्यात आला. या शिबिरात वंचित असलेल्यांना शासनाच्या विविध योजनेतून लाभ देण्यात आला. या शिबिरास लोहारा शहरातुन व ग्रामीण भागातुन महिला, वृध्द व्यक्ती, एकल महिला, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबिर तहसीलदार संतोष रुईकर यांनी आयोजित केल्याने शहरातुन व परिसरातुन कौतुक करण्यात येत आहे.
 
Top