Views
*अमृत महोत्सव अभियान अंतर्गत लोहारा शहरात नगरपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा प्रभात फेरी काढुन मोठ्या प्रमाणात जनजागृती*लोहारा/प्रतिनिधी

या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस हा देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा होतोय, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे. 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी लोहारा शहरात नगरपंचायतीच्या वतीने दि.10 ऑगस्ट 2022 रोजी लोकसहभाग वाढावा म्हणून विद्यार्थ्यांची तिरंगा प्रभात फेरी काढुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. 

    या भव्य प्रभातफेरीची सुरुवात नगर पंचायत कार्यालयापासून तिरंगा ध्वज दाखवून करण्यात आली. हि प्रभात फेरी नगरपंचायत कार्यालयापासुन छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते आझाद चौक मार्गे काढण्यात आली. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषात भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी तहसीलदार संतोष रूईकर, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, मुख्याधिकारी गजानन शिंदे, नायब तहसीलदार स्वामी, गटविकास आधिकारी शीतल खिंडे, प्रभारी पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 

  या प्रभात फेरीत हायस्कूल लोहारा, वसंतदादा पाटील हायस्कूल, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अभिमान खराडे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, नगरसेवक अमिन सुंबेकर, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, नगरपंचायतचे अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, युवा सेना शहर प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक विजयकुमार ढगे, नगरसेवक प्रशांत काळे, के.डि. पाटील, नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे, बालाजी चामे, स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे, बांधकाम अभियंता सुमित पाटील, लेखापरीक्षक दिपक मुंडे, कर निरीक्षक मनोज खराडे, कमलाकर मुळे, लिपिक श्रीशैल्य मिटकरी, मतीन शेख, गणेश काडगावे, विलास भंडारे, बाळु सातपुते, नवनाथ लोहार, जहिर शेख, यांच्यासह नगरसेवक, महसूल व पोलीस कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

 
Top