Views





*जिल्हा स्त्री रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा*
 
उस्मानाबाद/प्रतिनिधी

       दरवर्षी 1 ते 7 ऑगष्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. या निमित्ताने येथील जिल्हा स्त्री  रूग्णालयात आज जागतिक स्तनपान  सप्ताह  उत्साहात साजरा करण्यात आला. या  वेळी  माता, गरोदर  मातासह ,  कर्मचारी  नातेवाईक  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते.  या  कार्यक्रमाचे उदघाटन  स्त्री  रुग्णालय चे वैद्यकीय  अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे -गवळी, वरिष्ठ  बालरोग तज्ज्ञ  डॉ. सुर्यवंशी, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. टिके, भूलतज्ज्ञ डॉ. सोनटक्के, बालरोग तज्ज्ञ डॉ. मनियार, मराठे सहा अधिसेविका , स्त्री रुग्णालयातील सर्व परिचारिका, सर्व एलएचव्ही, आशा कार्यकर्ती, नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य व शिक्षक प्रमुख उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी नर्सिंग महाविद्यालयायाच्या विद्यार्थ्यांनी स्तनपान या विषयावर नाटिका सादर केली.
           

      यावेळी डॉ. स्मिता सरोदे -गवळी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्तनपानामुळे बाळाला संपूर्ण आहार मिळतो.  सहज पचन होते, रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते, त्यामुळे जंतुसंसर्गापासून संरक्षण मिळते. तसेच बाळाचा  शारिरीक आणि बौध्दिक विकास होतो.  बाळाचे कुपोषण कमी करण्यास मदत होते. मातेचे दूध सहज आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते.स्तनपानामुळे आईचे ही विविध आजरापासून सरंक्षण होते. आईने बाळास स्तनपान कसे करावे याचे मार्गदर्शन रुग्णालयात केले जात असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी, परिचारिका, माता व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




 
Top