Views


*आजादी का अमृत महोत्सव या उपक्रम अंबी पोलीस ठाण्यात उत्साहात पार*

*आंबी पोलीस अधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद*


उस्मानाबाद/प्रतिनिधी परंडा तालुक्यातील अंबी पोलीस ठाण्यात 
आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत दि.4 गुरुवारी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला  कल्याण माध्यमिक विद्यालय कुकडगाव व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सोनारी येथे राष्ट्रध्वज हाताळण्यातबाबत मार्गदर्शक तत्त्वे तसेच हर घर तिरंगा बाबत शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच सरकारी नोकरी व सैन्यदलात भरती बाबत मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील प्रत्येक माता-भगिनींना राज्य घटनेमुळे सुरक्षित जगण्याचा अधिकार मिळाला आहे. 

     यासाठी त्यांचे हक्क व कायदे या बाबत जनजागृती करून गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच प्रतिबंध होण्यासाठी अंबी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच डिजिटल आणि इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी क्षेत्रा पासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करून सुसंवाद साधला. सध्या कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत डायल 112 , पर्यावरण अबाधित राहावे यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे, मुलभूत हक्क, मुलभुत कर्तव्य, शासकीय मालमत्ता संरक्षण, सामान्य ज्ञान, वेपण माहिती,पोलीस दीदी व पोलिस काका यांच्या माध्यमातून पोलिसांविषयी असलेले समज-गैरसमज, वाहतुकीचे नियम, बाल लैंगिक अत्याचार, व्यसनमुक्ती व गुडटच ,बॅडटच याबाबत देखील मार्गदर्शन केले. कायदेविषयक असलेले ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षकांना व पालकांना समजावून सांगितले. पोलीस दलातील सध्या वापरात असलेले स्वयंचलित हत्यारे याबाबत विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती देण्यात येऊन ती त्यांना हाताळण्यासाठी देण्यात आली. 

    हे उपक्रम पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक नवनित कावत,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दिनकर डंबाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष  खांडेकर,पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण माने,पोलीस नाईक फिरोज शेख, महिला पोलीस अंमलदार सुनीता पवार यांनी हजर राहून योग्य ते मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी सोनारी येथील सरपंच दिपक दुबळे, रवि मांडवे, मुख्याध्यापक विजय कुलकर्णी यांच्या सह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कल्याण माध्यमिक विद्यालय कुकडगाव येथील मुख्याध्यापक हनुमंत शिरसागर, संस्थाचालक बाळासाहेब गटकळ व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top