Views
*लाचखोर ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात*


कळंब/ प्रतिनिधी 
           
  तालुक्यातील ईटकुर ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी यास 5000/- रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने दि. 19 रोजी दुपारी सापळा रचून रंगेहाथ पकडले.  
   तक्रारदार यांचे वडिल व चुलते यांनी घेतलेल्या सामाईक घर जागेचे तक्रारदार यांचे वडिलांचे नावे वैयक्तिक फेर नोंद घेवून आठ अ ची नक्कल वैयक्तिक नावावर करून मिळणे बाबत यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडलांचे नावे लोकसेवक एजाज बशीर शेख , वय- 50 वर्षे पद - ग्रामविकास अधिकारी, इटकूर, ता. कळंब वर्ग-3 यांच्याकडे अर्ज दाखल केलेला होता.सदर काम करून देण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच रकमेची मागणी करून 5000/- रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली.

 सदर कार्यवाही ही मा.डॉ.राहुलखाडे,पोलीसअधीक्षक,ला.प्र.वि. औरंगाबाद.मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक उस्मानाबाद,
सापळा पथक - प्रमुख विकास राठोड पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद
 पोलीस अंमलदार मधुकर जाधव,सचिन शेवाळे , अर्जुन मारकड, सिधेस्वर तवस्कर, चापोना / दत्तात्रय करडे यांनी कार्यवाही केली.


*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*
प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 9527943100
श्री अशोक हुलगे,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं.8652433397
विकास राठोड,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 7719058567
कार्यालय 02472 222879
 
Top