Views


*पत्रकारिता कार्यशाळेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे - अशोक शिंदे*

कळंब/प्रतिनिधी 

पत्रकारिता मध्ये करिअर करणाऱ्या पत्रकारांनी, विविध संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुखांनी मंगळवारी (ता.26) रोजी होणाऱ्या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.

          कळंब येथे शि. म. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या जयंती निमित्त, माहिती कार्यालय उस्मानाबाद कळंब तालुका पत्रकार संघ, सा.साक्षी पावन ज्योत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन मोहेकर महाविद्यालयाच्या सभागृहात केलेले आहे,सद्या सोशल मीडिया वर मोठया प्रमाणात पोस्ट टाकल्या जातात.काही आक्षेपार्ह असतात, त्यामुळे जतिजाती मध्ये तेढ निर्माण होत आहे. सोशल मीडियाचा वापर करणारा हा ही पत्रकार पत्रकार समजला जात आहे,विश्वासाहर्ता मिळावी या साठी त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे.क्रीडा, सांस्कृतिक, शेतीविषयक , स्फुटलेखन , संघटनेच्या बातम्या कशा लिहाव्या हे या कार्यशाळेतून शिकवले जाणार आहे.यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेसाठी नवोदित पत्रकार , ग्रामीण पत्रकार, संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, सां.साक्षी पावन ज्योत चे संपादक सुभाष घोडके, तसेच माहिती कार्यालय च्या वतीने करण्यात आले आहे. .

 
Top