Views







*श्री संत एकनाथ महाराजांची दिंडी साठी भारतीय जनता पार्टी तर्फे अल्पोपहार*

कळंब/प्रतिनिधी 

श्री संत एकनाथ महाराज दिंडी मुडाणा येथून आज कळंब येथे आली असता भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांनी सर्व वारकऱ्यांची नेहमीप्रमाणे अल्पोपहाराची सोय केली.दिंडीचे प्रमुख ह.भ.प. भागवताचार्य श्री. तानाजी महाराज बोरकर यांचा सत्कार तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
 यावेळी भैय्या बाविकर,माणिक बोंदर,शिवाजी गिड्डे पाटील,सुखदेव राखुंडे,संजय जाधवर,युवक मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे,सामाजिक कार्यकर्ते मोहसीन मिर्झा, शिवाजी शेंडगे,शिवाजी शिरसट,इम्रान मुल्ला,मनोज राखुंडे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top