Views


*शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली*

*शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना*

उस्मानाबाद/ प्रतिनिधी  उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 


    अमित माळी हा कळंब शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. अमित माळीच शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीवर वाईट नजर होती. तो तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील मेसेजही पाठवायचा. त्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. यातून ही मुलगी गर्भवती राहिली. 

मुलीला शारिरीक वेदना होऊ लागल्याने कुटुंबाने तिला उरपाचारासाठी रुग्णालयात नेलं. तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. त्यानंतर पीडित मुलीकडे सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मुंलीच्या तक्रारीवरुन नराधम शिक्षकाला कळंब पोलिसांनी अटक केली. आरोपीस न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .

संस्थेने ही केली निलंबनाची कारवाईकळंब शहर हे जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेले शहर आहे .त्यामुळे शिक्षणाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक मुलं मुली शहरात येतात. पण हा प्रकार समोर येताच शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेने अमित माळी याला तात्काळ निलंबित केलं आहे. 

या घटनेनंतर पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे तपासाची चक्रे फिरवत या घटनेच्या मुळाशी जाऊन काम करायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या आणखी घटना घडल्या आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत. मुलींची छेडछाड किंवा अत्याचाराच्या घटना होत असतील तर संबंधिताने न घाबरता पोलिसांची तात्काळ संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केलं आहे.
 
Top